गुहेतून सुटका म्हणजे चमत्कारच

वृत्तसंस्था
गुरुवार, 19 जुलै 2018

एक-दोन नव्हे, तर तब्बल नऊ दिवसांनंतर गुहेतून सुखरूपपणे बाहेर आलेले 12 फुटबॉलपटू आणि एका प्रशिक्षकाने ही घटना म्हणजे आपल्या आयुष्यातील "चमत्कार' असल्याचे म्हटले आहे. आठवडाभर रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर या फुटबॉलपटूंना आज रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यानंतर ते प्रथमच प्रसारमाध्यमाच्या रूपातून जनतेसमोर आले. यानिमित्ताने येथे सर्व फुटबॉलपटूंसाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 
 

चिआंग राय (थायलंड) : एक-दोन नव्हे, तर तब्बल नऊ दिवसांनंतर गुहेतून सुखरूपपणे बाहेर आलेले 12 फुटबॉलपटू आणि एका प्रशिक्षकाने ही घटना म्हणजे आपल्या आयुष्यातील "चमत्कार' असल्याचे म्हटले आहे. आठवडाभर रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर या फुटबॉलपटूंना आज रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यानंतर ते प्रथमच प्रसारमाध्यमाच्या रूपातून जनतेसमोर आले. यानिमित्ताने येथे सर्व फुटबॉलपटूंसाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

पत्रकार परिषदेत बारा फुटबॉलपटू आणि त्यांच्या प्रशिक्षकाने पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तर दिले.चौदा वर्षीय अदुल सॅम म्हणाला, की ही घटना चमत्कारापेक्षा कमी नाही. जोपर्यंत आम्ही बचावपथकाच्या नजरेस पडलो नव्हतो, तोपर्यंत आम्ही गुहेतील दगडातून झिरपणाऱ्या पाण्याने तहान आणि भूक भागवली, असे संघातील अन्य एका सदस्याने पत्रकाराना सांगितले. 

तत्पूर्वी, पत्रकार परिषदेसाठी या मुलांना रुग्णालयाच्या गाडीतून नेण्यात आले. या वेळी माध्यमांचे प्रतिनिधी त्यांची वाट पाहत होते. पत्रकार परिषदेच्या आयोजकांनी या घटनेबाबत आपल्या मनातील सर्व प्रश्‍नांची उत्तरे आज मिळतील, असे सांगितले. विशेष म्हणजे या प्रश्‍नांची उत्तरे मुले स्वत: देतील, असे सांगण्यात आले. ही मुले अगदी कठीण काळातून बाहेर आले आहेत. अनावधानाने मानसिक त्रास होणारे प्रश्‍न विचारले, तर कायद्याचे उल्लंघन होईल, असे आयोजकाने बजावले. मुलांचा खासगीपणा जपण्याचा सल्लादेखील देण्यात आला. 

नऊ दिवसांचे बचावकार्य 
"वाइल्ड बोर्स' नावाच्या फुटबॉल टीमने 23 जून रोजी सरावानंतर एक तासाचा थाम लुआंग गुहेत जाण्याचा कार्यक्रम केला होता. मात्र, मुसळधार पाऊस आणि पूर आल्याने ते गुहेत अडकले गेले. ब्रिटनच्या दोन पाणबुड्यांनी 2 जुलैला या मुलांना शोधले. गुहेत काही किलोमीटर आतमध्ये ही मुले होते. तीन दिवस चाललेल्या मदतकार्यातून या मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. बचाव पथकात थायलंड नौदलाचे आणि जागतिक पातळीवरचे गुहातज्ज्ञ देखील होते. या बचावकार्याने जगाचे लक्ष वेधले गेले. डिस्कव्हरी चॅनेलवर 20 जुलै रोजी या बचावकार्यावर माहितीपट प्रसारित करण्यात येणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thai cave footballers and coach describe miracle rescue