
थोडक्यात
थायलंडने कंबोडियाच्या लष्करी तळांवर हवाई हल्ले केले, ज्यामुळे प्रेह विहार मंदिराजवळील सीमावाद तीव्र झाला.
कंबोडियाने थायलंडवर प्रादेशिक अखंडतेचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आणि स्वसंरक्षणासाठी प्रत्युत्तर दिले.
मे २०२५ पासून सुरू झालेल्या या वादात दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले केले, राजनैतिक संबंध कमी केले आणि सीमा बंद केल्या.
थायलंड आणि कंबोडियामधील वादग्रस्त सीमेवरून तणाव शिगेला पोहोचला आहे. कंबोडिया आणि थायलंडने एकमेकांवर हल्ले केले आहेत. हे प्रकरण फक्त गोळीबार करण्यापुरते मर्यादित राहिले नाही, थायलंडने दोन कंबोडियन लष्करी तळांवर हवाई हल्ले केल्याची पुष्टी थाई सैन्याने केली आहे. याच्या काही तासांपूर्वीच दोन्ही देशांनी एकमेकांशी राजनैतिक संबंध किमान पातळीवर आणले होते.