थायलंडच्या राजाने केला 'बॉडीगार्ड'सोबत विवाह!

वृत्तसंस्था
गुरुवार, 2 मे 2019

बँकॉकः थायलंडचे राजा महा वजीरालोंगकोर्न (वय 66) यांनी त्यांच्या सुथिदा तिजाई या सुरक्षारक्षकेशी (बॉडीगार्ड) बुधवारी (ता. 1) विवाह करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. वजीरालोंगकोर्न यांचा हा चौथा विवाह आहे.

बँकॉकः थायलंडचे राजा महा वजीरालोंगकोर्न (वय 66) यांनी त्यांच्या सुथिदा तिजाई या सुरक्षारक्षकेशी (बॉडीगार्ड) बुधवारी (ता. 1) विवाह करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. वजीरालोंगकोर्न यांचा हा चौथा विवाह आहे.

वजीरालोंगकोर्न यांच्या विवाहाचा विधी थाय वृत्तवाहिन्यांवर प्रसारित करण्यात आला. पुढील काही दिवसांमध्ये थायलंडच्या राजाचा अधिकृतरित्या राज्याभिषेक होणार आहे. विवाहानंतर त्यांनी सुथिदा यांना राणीचा दर्जा दिला आहे. वजीरालोंगकोर्न यांना पहिल्या तीन राण्यांपासून पाच मुले आणि दोन मुली आहेत. पहिल्या पत्नींपासून त्यांनी घटस्फोट घेतला आहे. 'रॉयल गॅझेट' या वृत्तपत्रातून या शाही विवाहाची घोषणा करण्यात आली.

वजीरालोंगकोर्न यांना राजा राम दहावे म्हणूनही ओळखले जाते. त्यांचे वडील राजा भूमिबोल अदुल्यादेज यांचे 13 ऑक्टोबर 2016 रोजी निधन झाले. त्यानंतर वजीरालोंगकोर्न यांना राजा घोषित करण्यात आले. राजा अदुल्यादेज यांच्या निधनावर एक वर्षाचा शोक घोषित करण्यात आला होता. त्यामुळे राजा वजीरालोंगकोर्न यांचा राज्याभिषेक करता आला नव्हता.

2014 मध्ये वजीरालोंगकोर्न यांनी सुथिदा तिजाई यांची वैयक्तीक सुरक्षारक्षक पथकामध्ये डेप्युटी कमांडर म्हणूण नियुक्ती केली होती. त्याआधी सुथिदा थायलंड एअरवेजमध्ये फ्लाइट अटेंडंट म्हणूण काम करत होत्या. वजीरालोंगकोर्न हे राजा झाल्यावर त्यांनी सुथिदा यांना 2016 मध्ये सेनेत जनरल हे पद दिले होतं. 2017 मध्ये त्या राजासोबत वैयक्तीक सुरक्षारक्षक म्हणून राहत होत्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thailand king marries bodyguard ahead of coronation

टॅग्स