Condom Export: हा आहे जगात सर्वात जास्त कंडोम निर्यात करणारा देश, हे आहेत सर्वात मोठे खरेदीदार

लोकसंख्या नियंत्रण हे आजवर अनेक देशांना न उमगलेलं कोडंच आहे.
Condom Export
Condom ExportSakal

जेव्हा तुम्ही भारतातील लोकांना थायलंडबद्दल विचाराल तेव्हा ते तुम्हाला बँकॉक, पट्टाया आणि फुकेत सारख्या पर्यटन स्थळांबद्दल सांगतील. दरवर्षी भारतातून लाखो लोक थायलंडला भेट देण्यासाठी जातात.

परंतु तुम्हाला माहित आहे का की संपूर्ण जगाची लोकसंख्या नियंत्रित करण्यात थायलंडची भूमिका खूप महत्त्वाची आहे. होय, थायलंड हा जगातील सर्वात मोठा कंडोम निर्यातदार देश आहे.

थायलंड हा जगातील सर्वात मोठा नैसर्गिक रबर उत्पादक देश आहे. येथील वाणिज्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 2022 मध्ये हा जगातील अव्वल कंडोम निर्यात करणारा देश ठरला आहे. जगातील एकूण कंडोम निर्यातीत त्याचा वाटा 44 टक्के आहे, जो गेल्या वर्षी 2021 मध्ये 43.7 टक्के होता.

चीन, अमेरिका सर्वात मोठा आयातदार:

थायलंडच्या वाणिज्य मंत्रालयाच्या मते, देशाने 2022 मध्ये 272.3 दशलक्ष डॉलर (सुमारे 2,225.90 कोटी रुपये) किंमतीचे कंडोम निर्यात केले. थायलंडमधून कंडोमची सर्वाधिक निर्यात चीनला केली जाते, त्यानंतर अमेरिका आणि व्हिएतनामचा क्रमांक लागतो.

पर्यटनाव्यतिरिक्त थायलंडच्या अर्थव्यवस्थेत कंडोम आणि फळांच्या निर्यातीचा मोठा भाग आहे. थायलंडच्या ड्युरियन (एक प्रकारचा जॅकफ्रूट) या फळांचेही बरेच प्राबल्य आहे. 2022 मध्ये थायलंडने 3.22 अब्ज डॉलर (सुमारे 26,322 कोटी रुपये) किंमतीचे ड्युरियन निर्यात केले.

Condom Export
ED Raids: Byju's सीईओ रवींदरन यांच्या घराची आणि कार्यालयाची ईडीने घेतली झडती; काय आहे प्रकरण

रबर आणि फळांची निर्यात:

थायलंडमधून रबर आणि फळे निर्यात केली जातात, तरीही थायलंडच्या एकूण निर्यातीमध्ये ते 10 टक्क्यांहून कमी आहे. तर देशाची एकूण निर्यात थायलंडच्या जीडीपीच्या निम्म्याहून अधिक आहे. यावर्षी जागतिक मागणीत घट झाली असली तरी, थायलंड सरकारला देशाची निर्यात वाढण्याची अपेक्षा आहे.

अलीकडे, थायलंडच्या ड्युरियन निर्यातीला व्हिएतनामकडून आव्हान मिळू लागले आहे. 2021 मध्ये व्हिएतनामला चीनमध्ये ड्युरियन विकण्याची परवानगी मिळाली. याचा थेट परिणाम थायलंडच्या बाजारपेठेवर होत आहे. चीन हा थायलंडच्या ड्युरियनचा सर्वात मोठा खरेदीदार आहे.

Condom Export
Silicon Bank दिवाळखोरीः भारतावर नाही होणार दीर्घकालिन परिणाम...का ते वाचा!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com