esakal | Nobel Prize 2021 : टांझानियाच्या अब्दुल रजाक गुरनाह यांना साहित्यातला नोबेल जाहीर
sakal

बोलून बातमी शोधा

Abdulrazak Gurnah

Nobel Prize: अब्दुल रझाक गुरनाह यांना साहित्यातला नोबेल जाहीर

sakal_logo
By
अमित उजागरे

जिनिव्हा : Nobel Prize 2021 : यंदाचा साहित्यातील नोबेल पुरस्कार टांझानियाचे कादंबरीकार अब्दुल रझाक गुरनाह यांना जाहीर झाला आहे. वसाहतवादाच्या परिणामांबाबत बिनधास्त आणि करुणामय लिखाण तसेच संस्कृती आणि खंडांमधील गल्फ देशांतील निर्वासितांचे भवितव्य यावरील कादंबरीसाठी त्यांना नोबेल जाहीर झाला आहे. त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये निर्वासितांचं मार्मिक वर्णन पहायला मिळतं.

अब्दुल रझाक गुरनाह यांचा जन्म १९४८ मध्ये टांझानियाच्या जंजीबारमध्ये झाला. १९६० च्या दशकाच्या शेवटी एका शरणार्थी म्हणून ते इंग्लंडला पोहोचले. निवृत्तीपूर्वी ते केंट विद्यापीठात कँटरबरी येथे 'इंग्रजी' आणि 'वसाहतवादी साहित्याचा पुढील काळ' या विषयाचे प्राध्यापक होते. गुरनाह यांनी वयाच्या २१ वर्षापासून लिखाणाला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी स्थानिक भाषेत लिहायला सुरुवात केली पण नंतर इंग्रजीलाच त्यांनी आपल्या लेखणीची भाषा बनवलं. यापूर्वी १९८६ मध्ये वोले सोविंका या अफ्रिकी कृष्णवंशीय लेखकाला नोबेल मिळाला होता त्यानंतर यंदा गुरनाह यांनी हा पुरस्कार पटकावला आहे.

पॅराडाईजने दिली ओळख

गुरनाह यांची चौथी कादंबरी 'पॅराडाईज'ने (१९९४) त्यांना लेखक म्हणून एक ओळख मिळवून दिली होती. पॅराडाईज ही २०व्या शतकात टांझानियात वाढत असलेल्या एका मुलाची गोष्ट आहे. या कादंबरीसाठी त्यांना बुकर पुरस्कारानं गौरविण्यात आलं होतं. १९९०मध्ये पूर्व अफ्रिकेतील एका शोधयात्रेदरम्यान त्यांनी ही कादंबरी लिहिली होती. ही एक दुःखद प्रेमकथा असून यामध्ये जग आणि परंपरा एकमेकांना भिडलेल्या पहायला मिळतात.

दरम्यान, शरणार्थींच्या अनुभवाचं अब्दुल रझाक गुरनाह यांनी ज्या प्रकारे वर्णन केलं आहे, ते क्वचितच बघायला मिळतं. ओळख आणि आत्मचरित्रावर त्यांच्या लिखाणाचा फोकस असतो. संस्कृती आणि खंडांमधील असं जीवन ज्यावर कुठलाही तोडगा निघत नाही, हे त्यांच्या लिखाणात दिसून येतं.

अब्दुल गुरनाह यांच्या कादंबऱ्या

  1. मेमोरी ऑफ डिपार्चर (Memory of Departure) - 1987

  2. पिलीग्रीम्स वे (Pilgrims Way)- 1988

  3. डॉट्टी (Dottie) - 1990

  4. पैराडाइस (Paradise) - 1994

  5. अॅडमायरिंग साइलेंस (Admiring Silence) - 1996

  6. बाय द सी (By the Sea) - 2001

  7. डेसर्सन (Desertion) - 2005

  8. द लास्ट गिफ्ट ( The Last Gift) - 2011

  9. ग्रावेल हर्ट (Gravel Heart) - 2017

  10. ऑफ्टर लाईव्ह्ज (Afterlives) - 2020

loading image
go to top