
बेळगाव : सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळांमधील ग्रंथालयांसाठी पुस्तके खरेदी करण्यासाठी शिक्षण खात्याकडून साडेसहा हजार रुपये मंजूर केले आहेत. पण या निधीतून कन्नड पुस्तकेच खरेदी करण्याची सक्ती केली. शहरातील कोल्हापूर सर्कलजवळील एकाच दुकानातून कन्नड पुस्तके खरेदी करण्यात येणार आहेत.