अफेअर्समुळं राष्ट्राध्यक्षपदावरुन व्हावं लागलं पायउतार! जगातील 'ते' पाच नेते कोण? जाणून घ्या

Political leaders affairs: जगात असे अनेक लोक आहेत. जे त्यांच्या अफेअर्समुळे गोत्यात आले आहेत. त्यामध्ये अनेक राजकीय नेत्यांचाही समावेश आहे. अशाच पाच नेत्यांविषयी आपण जाणून घेणार आहोत.
Political Leaders
Political LeadersEsakal

Politicians Affairs :चीनचे परराष्ट्र मंत्री किन गॅंग बराच काळ गायब होते, ही गोष्ट समोर येताच त्यांना पदावरुन हटवण्यात आलं. अहवालानुसार, किन गॅंग यांचे हॉंगकॉंगची टीव्ही अ‍ॅंकर फू शियाओटियन हीच्याशी प्रेमसंबंध होते. ज्याचा परिणाम त्यांना भोगावा लागला.

शियाओटियनवर डबल एजंट असण्याचा आणि ब्रिटीश गुप्तचर विभागाशी संबंध असल्याची शंका आहे. नुकतीच तिने गॅंग यांची मुलाखत घेतली होती.या चर्चेदरम्यान दोघांचे हाव भाव संशयास्पद होते.

एखाद्या प्रेम प्रकरणामुळे नेत्याला पदावरुन हटवल्याची ही काही पहिली वेळ नाही. ही वेगळी गोष्ट आहे की, या सर्व एखाद्याच्या वैयक्तिक गोष्टी आहेत,पण सत्तेच्या शीर्षस्थानी बसणाऱ्या लोकांसाठी ही गोष्ट धोकादायक ठरु शकते. चला तर मग जाणून घेऊयात त्या प्रभावी नेत्यांविषयी ज्यांना आपल्या प्रेम-प्रकरणामुळे पदावरुन पायउतार व्हावे लागले.

राष्ट्रपती पार्क यांचे चोई सून सिल यांच्याशी संबंध

दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती पार्क ग्यून हे यांना २०१६मध्ये मोठ्या राजकीय भूकंपाचा सामना करावा लागला, जेव्हा त्यांचे चोई सून सिल हीच्याशी असलेले घनिष्ठ संबंध जगासमोर आले. चोईला पार्क यांच्या निर्णयावर अनुचित प्रभाव पाडताना बघण्यात आलं.

त्यामुळे त्यांना सार्वजनिक आक्रोश आणि मोठ्या प्रमाणावर विरोध प्रदर्शने करण्यात आली.त्यानंतर पार्क यांच्यावर महाभियोगाची कारवाई करण्यात आली आणि पदावरुन हटवण्यात आलं.

Political Leaders
World Hepatitis Day 2023: वर्ल्ड हेपेटाइटिस डे का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास व महत्त्व

मलेशियन उपप्रधानमंत्र्यांचे सहकाऱ्यासोबत संबंध

१९९८मध्ये, मलेशियाचे उपपंतप्रधान अनवर इब्राहिम एका धक्कादायक घोटाळ्यामध्ये अडकले होते. त्यांच्यावर आपल्या माजी पुरुष सहकाऱ्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा आरोप ठेवण्यात आला होता. भ्रष्टाचार आणि अनैसर्गिक संबंध ठेवल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आणि तुरुंगवास भोगावा लागला. त्यानंतर त्यांना पदावरुन हटवण्यात आले.

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री आसिफ यांचे अमेरिकी नागरिकासोबत संबंध

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांच्यावर लग्नांनंतरही अमेरिकी नागरिकासोबत संबंध ठेवण्याचा आरोप करण्यात आला होता. २०१८मध्ये या गोष्टीवर मोठा वाद बघायला मिळाला. आरोप फेटाळल्यानंतरही त्यांना देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने पदासाठी अयोग्य घोषित करण्यात आलं.

Political Leaders
Rajasthan : ऑनलाइन प्लॅटफॉर्मशी संबंधित गिग वर्कर्स युवकांना राजस्थान सरकारचा मोठा दिलासा

राष्ट्रपती क्लिंटन यांचे मोनिका लेविंस्कीशी होते अनैतिक संबंध

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांचे व्हाईट हाऊसमधील इंटर्न मोनिका लेविंस्कीशी अनैतिक संबंध होते. हे प्रकरण हल्लीच्या इतिहासातील सर्वात गाजलेलं प्रकरण होतं. हे प्रकरण १९९८मधील आहे. क्लिंटन यांच्यावर महाभियोगाची कारवाई करण्यात आली.मात्र, ते सेनेटच्या कारवाईपासून वाचले आणि त्यांनी त्यांचा कार्यकाळ पूर्ण केला. मात्र, या अनैतिक संबंधांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीवर कलंक लावून टाकला.

हाय-एंड एस्कॉर्ट्ससोबत गव्हर्नरचे संबंध

न्यू यॉर्क शहराचे गव्हर्नर एलियट स्पिट्झर राजकारणतले चमकणारे व्यक्ती होते, जोपर्यंत हाय-एंड एस्कॉर्ट्ससोबत त्यांचे संबंध उघडकीस आले नव्हते. या बातमीने पूर्ण देश आश्चर्यचकित झाला होता. त्यांना कायदेशीर कारवाई आणि सार्वजनिक तपासाचा सामना करावा लागला. त्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीमाना दिला.

Political Leaders
Gyanvapi Masjid Case: अलाहाबाद हायकोर्टानं ASI सर्व्हेची स्थगिती वाढवली; उद्या होणार सुनावणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com