वन मॅन आर्मी; रशियाला भिडणार जगातील 'बेस्ट स्नायपर' Wali

एका दिवसात ४० शत्रूंना बनवितो निशाना, दोनदा बनला आहे अफगानिस्तानच्या युद्धाचा हिस्सा
वन मॅन आर्मी; रशियाला भिडणार जगातील 'बेस्ट स्नायपर' Wali

मागील १५ दिवसांमध्ये सुरू असलेले रशिया आणि यूक्रेनचे यूद्ध (Russia and Ukraine) थांबायचे काही नाव घेत नाही. दोन्ही देशांमध्ये यूद्ध थांबविण्यासाठी एकमत होत नाही. दरम्यान जगातील बेस्ट स्नायपर (Most Famous Sniper) 'शामिल वली '(Wali) देखील यूद्धामध्ये सहभागी झाला आहे. वली रोज आपल्या बंदूकीने सरासरी ४० शत्रूंना निशाना बनवितो.

वली एक फ्रेंच कॅनेडियन कॉप्यूटर सायंटिस्ट आहे. त्याने २ वेळा अफगानिस्तान युद्धामध्ये सुरु असलेल्या स्पेशनल ऑपरेशनमध्ये सहभाग घेतला होता. २००९ ते २०११पासून त्यानी आपली बंदूकीने कित्येक शत्रूंना निशाना बनविले आहे. त्यानंतर त्याचे वली असे नाव पडले.

वन मॅन आर्मी; रशियाला भिडणार जगातील 'बेस्ट स्नायपर' Wali
CBSE बोर्डाच्या तारखा जाहीर... दहावीचं वेळापत्रक आलं!

यूक्रेनच्या लोकांची मदत करू इच्छितो वली

वल्ड मीडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये वली ने सांगितले की, त्याला यूक्रेनमध्ये येऊन चांगले वाटत आहे. त्याला असे वाटते की, यूक्रेनमध्ये लोकांसोबत त्याची जूनी ओळख आहे. त्यांनी सांगितले की, यूक्रेनच्या लोकांची तो मदत करू इच्छित आहे. रशियावर आरोप लावताना वलीने सांगितले की, रशिया यूक्रेनमधील निष्पाप लोकांवर फक्त यासाठी बॉम्ब हल्ला करत आहे की, त्यांना रशियन नव्हे तर यूरोपीयन व्हायचे आहे. त्यांनी सांगितले की, एका आठवड्यामध्ये कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंगमध्ये व्यस्त होता पण आता युद्धाच्या मैदानामध्ये आपली बंदूक घेऊन उतरला आहे. हेच त्याचे सत्य आहे. त्याने सांगितले की, युक्रेनच्या युद्धामध्ये मी सहभागी व्हावे हे पत्त्नीला आवडले नाही तरी मी ठाम निर्णय केला आणि युक्रेनमध्ये निघून आलो.

वली लोकांसमोर येण्यासाठी घाबरत नाही

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जगात अनेक प्रसिद्ध स्नायपर्स आहेत. मात्र ते सार्वजनिक ठिकाणी येण्याचे टाळतात. पण वली वेगळा आहे, दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमांमध्ये तो सहभागी होतो. कॅनेडियन त्याला चांगले ओळखतात.

The world's best sniper Wali participate in Russia Ukraine War
The world's best sniper Wali participate in Russia Ukraine War
वन मॅन आर्मी; रशियाला भिडणार जगातील 'बेस्ट स्नायपर' Wali
Mumbai 1993 Bomb Blast : स्वप्न नगरीला हादरवून सोडणारं भयावह सत्य

सर्वात लांब अंतराचे लक्ष्य केले साध्य

वली हा कॅनेडियन जॉइंट टास्क फोर्स (JTF-2) युनिटमध्ये शिपाई आहे. या युनिटच्या स्नायपर्सच्या नावावर सर्वात लांब पल्ल्याच्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्याचा विक्रम आहे. मिळालेल्या माहितीनुसार, JTF-2 च्या सैनिकांचा 3,540 मीटर अंतरावर लक्ष्य गाठण्याचा विक्रम आहे. जेव्हा युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी परदेशी सैन्याला रशियाविरुद्ध लढण्यासाठी आमंत्रित केले, तेव्हा वलीने न घाबरता युक्रेनला मदत करण्याचा निर्णय घेतला.

किती श्रेणींमध्ये विभागले आहेत स्नायपर

Snipers देखील श्रेणींमध्ये विभागले आहेत. एक चांगला स्नायपर तो असतो जो दररोज 5 ते 6 शत्रूंना अचूकपणे लक्ष्य करतो. तसेच 7 ते 10 शत्रूंना लक्ष्य करणारा स्नायपर सर्वोत्तम मानला जातो. मात्र एका दिवसात 40 लोकांना टार्गेट करण्याची क्षमता वलीची आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com