डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्रपतीपदापासून दूर ठेवणार ही पुस्तके! 

donald trump.jpg
donald trump.jpg

वॉशिंग्टन- अमेरिकेतील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका जशाजशा जवळ येऊ लागल्या आहेत, तसे राजकीय वातावरण तापू लागलं आहे. कोरोना विषाणू आणि वर्णभेदविरोधी आंदोलनं असे मुद्दे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी डोकेदुखीचे ठरत असताना आणखी एका गोष्टीमुळे त्यांची चिंता वाढणार आहे. गेल्या काही महिन्यात प्रकाशित झालेली आणि पुढे प्रकाशित होणारी काही पुस्तके निवडणुकीमध्ये महत्वाची भूमिका बजावणार असल्याचं बोललं जातंय.  

चांगली बातमी! भारतातील पहिल्या कोरोना लसीच्या मानवी चाचणीला सुरुवात
फेसबुक आणि सोशल मीडियाच्या काळातही अमेरिकेचे अनेक नागरिक पुस्तके वाचून आपलं मत ठरवत असतात. त्यामुळे प्रकाशनाआधीच वादग्रस्त ठरत असलेलं मेरी ट्रम्प यांचं पुस्तक डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्रपतीपदाच्या दावेदारीवर प्रभाव टाकण्याची शक्यता आहे. मेरी ट्रम्प यांचे वडील डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे भाऊ होते. त्यांच्या मृत्यूनंतर संपत्तीसाठी मेरी ट्रम्प आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबाने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते.

मेरी ट्रम्प या साईकोलाजिस्ट असून त्यांनी आपले पुस्तक 'Too Much and Never Enough: How My Family Created the World’s Most Dangerous Man' मध्ये डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रपती बनण्याच्या योग्य नसल्याचं म्हटलं आहे. पुस्तकाचा अप्रकाशित मजकुर माध्यमांना मिळाल्यानुसार मेरी ट्रम्प यांनी दावा केला आहे की, "डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉलेज प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या सेट परिक्षेसाठी पैसे देऊन डमी उमेदवार बसवला होता. त्यामुळेच त्यांचा प्रतिष्ठित कॉलेजमध्ये प्रवेश होऊ शकला.  ट्रम्प हे एका तीन वर्षाच्या मुलाप्रमाणे आहेत. नेहमी ते आपलाच घोडा दामटत असतात"

मेरी ट्रम्प यांचे हे पुस्तक डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. म्हणूनच ट्रम्प यांच्या परिवाराने या पुस्तकावर बंदीची मागणी करत न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र, या पुस्तकावर प्रतिबंध येण्याची शक्यता फार कमी आहे.

सरकारी बंगल्यावरुन प्रियांका गांधी-केंद्रीय मंत्र्यामध्ये ट्विटर वॉर
मेरी ट्रम्प यांच्याशिवाय डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारकिर्दीतील माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माईकल बोल्टन यांचे पुस्तकही रिंगणात आहे. ‘The Room Where it happened: A White House Memoir’या पुस्तकानेही ट्रम्प यांना अडचणीत आणले आहे. या पुस्तकान बोल्टन यांनी धक्कादायक खुलासे केले आहेत. निवडणूक जिंकण्यासाठी ट्रम्प यांनी चीनची मदत मागितल्याचा दावा या पुस्तकात करण्यात आला आहे. तसेच ट्रम्प यांना ब्रिटेनकडे अणुबॉम्ब असल्याचं आणि फिनलँड हा देश असल्याची माहिती नसल्याचं बोल्टन यांनी या पुस्तकात म्हटलं आहे. बोल्टन यांच्या पुस्तकाच्या आतापर्यंत 10 लाखांपेक्षा अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत.

3 नोव्हेंबर रोजी अमेरिकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका होत आहेत. अशावेळी ट्रम्प यांच्यावर लिहिली गेलेली अनेक पुस्तके चर्चेत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी आतापर्यंत 3 हजार पुस्तके लिहिली गेली असल्याचं सांगितलं जातं.  त्यामुळे अमेरिकी निवडणुकीत पुस्तके रंगत आणणार असल्याचं दिसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com