नेतान्याहू यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे तिसरे प्रकरण

पीटीआय
सोमवार, 3 डिसेंबर 2018

जेरुसलेम : इस्राईलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू आणि त्यांच्या पत्नीच्या विरोधात भ्रष्टाचारप्रकरणी आरोप ठेवण्यास पोलिसांनी आज परवानगी दिली. नेतान्याहू यांच्यावर यापूर्वी दोन प्रकरणांमध्ये आरोप करण्यात आले आहेत. भ्रष्टाचार आणि इतर गैरव्यवरांच्या संदर्भातील तिसऱ्या प्रकरणात आता नेतान्याहू यांना आरोपी केले जाऊ शकते. पोलिसांच्या परवानगीमुळे नेतान्याहू आणि त्यांच्या पत्नीच्या नावाचा आरोपपत्रात समावेश करण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जाते.

आपल्याबाबत सकारात्मक वृत्तांकन करण्याच्या बदल्यात एका दूरसंचार कंपनीला परवानगी दिल्याचे आरोप नेतान्याहू यांच्या विरोधात ठेवण्यात आले आहे. फेब्रुवारीमध्ये पोलिसांनी भ्रष्टाचारांच्या इतर दोन प्रकरणांमध्ये नेतान्याहू यांच्या विरोधात आरोप ठेवले आहेत. नेतान्याहू यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. पंतप्रधानपदावरून हटविण्यासाठी विरोधकांनी केलेली ही खेळी असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. 

दरम्यान, भ्रष्टाचार, गैरव्यवहार, गोपनीयतेचा भंग आणि बेकायदा कृत्ये केल्याप्रकरणी नेतान्याहू यांच्या विरोधात पुरावे असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. लागोपाठ होत असलेल्या भ्रष्टाचारांच्या आरोपांमुळे नेतान्याहू यांना पद सोडावे लागू शकते, अशी शक्‍यता वर्तविली जात आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Third Case of Corruption Against Netanyahu