esakal | तिसऱ्या लाटेची ब्रिटनला धास्ती; हिवाळ्यात लॉकडाउनची शक्यता
sakal

बोलून बातमी शोधा

Corona New Variant

तिसऱ्या लाटेची ब्रिटनला धास्ती; हिवाळ्यात लॉकडाउनची शक्यता

sakal_logo
By
पीटीआय

लंडन - ब्रिटनमध्ये (Britain) ४५ टक्क्यांहून अधिक नागरिकांचे लसीकरण (Vaccination) पूर्ण झालेले असताना तिसऱ्या लाटेबाबत (Third Wave) भीती (Threaten) व्यक्त केली जात आहे. शास्त्रज्ञांनी यासंदर्भात इशारे दिले असून हिवाळ्यात (Winter) कोरोनाचा नवीन व्हेरियंट (Corona New Variant) येऊ शकतो, अशी शक्यता वर्तविली जात आहे. (Third Wave Threatens Britain Chance of Lockdown in Winter)

दुसऱ्या लाटेपासून ब्रिटनला दिलासा मिळत असताना आता तिसऱ्या लाटेच्या शक्यतेने ब्रिटनची झोप उडाली आहे. तिसरी लाट हिवाळ्यात येण्याची शक्यता असल्याने पुन्हा एकदा लॉकडाउन लागू करावे लागेल, असे चित्र आहे.

हेही वाचा: कोरोना रोखण्यासाठी दोन भिन्न लशी प्रभावी; WHOच्‍या शास्त्रज्ञांचा दावा

झिन्हुआ वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ब्रिटनमधील यंदाचा हिवाळा अडचणीचा राहू शकतो. वर्षाअखेरीस मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची बाधा अधिक होऊ शकते. ब्रिटिश सरकारची सल्लागार संस्था सायंटिफिक ग्रुप फॉर इमर्जेसिज (एसएजीई) ने कोरोना लाटेबाबत इशारा दिला आहे. प्रोफेसर कॅलम सॅम्पल यांनी म्हटले की, कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता अधिक आहे. परंतु पुढच्या वर्षी देशाची स्थिती सामान्य राहू शकते आणि बाजार पूर्ववत होऊ शकतो. तसेच कोरोनाच्या नवीन व्हेरियंटमुळे हिवाळ्यात लॉकडाउन लागू करावा लागेल, असे पब्लिक हेल्थ इंग्लंडचे संचालक सुसान हॉपिकिन्सने म्हटले आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी लस, चाचणी आणि उपचाराचे अन्य मार्ग उपलब्ध असतील, असे हॉपकिन्सने म्हटले आहे.

loading image
go to top