१६ बायका, १५१ मुलं तरीही पठ्ठ्याला करायचंय १७वं लग्न

सोशल मीडियावर होते १६ पत्नींच्या या दादल्याची चर्चा
१६ बायका, १५१ मुलं तरीही पठ्ठ्याला करायचंय १७वं लग्न

'एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत', असं कायम म्हटलं जातं. कधी-कधी ही उपमा वैवाहिक जोडप्यांनादेखील दिली जाते. दोन स्त्रियांसोबत लग्न केल्यामुळे नवऱ्याच्या होणाऱ्या फजितीचे अनेक किस्से आपण ऐकले असतील. परंतु, असं असतांनादेखील एका व्यक्तीने एक-दोन नव्हे तर तब्बल १६ लग्न केली आहेत. विशेष म्हणजे तो इतक्यावरच थांबला नसून त्याला आता १७ वं लग्न करायचं आहे आणि त्याच्या या १७ व्या लग्नासाठी पत्नींनीदेखील परवानगी दिली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर १६ पत्नींच्या (16 wives ) या दादल्याची चर्चा रंगली आहे. (this man has 151 children from 16 wives is going to marry 17th)

झिम्बाब्वे (Zimbabwe) येथे राहणाऱ्या मिशेक न्यांडोरो (Misheck Nyandoro) या ६६ वर्षीय व्यक्तीने तब्बल १६ लग्न केली असून त्यांनी १५१ मुलं आहेत. विशेष म्हणजे १६ पत्नी असतांनादेखील त्यांची लग्न करण्याची हौस काही फिटलेली नाही. मिशेक यांना आता पुन्हा एकदा बोहल्यावर चढण्याची इच्छा असून ते १७ वं लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

१६ बायका, १५१ मुलं तरीही पठ्ठ्याला करायचंय १७वं लग्न
Covid-19 : दोन वेगवेगळ्या लशींचे डोस घेतल्यास काय होतं?

मिशेक यांनी ३८ वर्षांपूर्वी बहुविवाह योजना करण्याचा निर्णय घेतला. याविषयी त्यांनी एका मुलाखतीदेखील दिली आहे. "मी नेमकं काय करतोय? तर, मी सध्या माझी बहुविवाह योजना पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. १९८३ मध्ये मी बहुविवाह करण्याचा निर्णय घेतला आणि अजूनही माझा हा निर्णय ढळलेला नाही. जोपर्यंत मृत्यू मला कवटाळत नाही,तोपर्यंत मी लग्न करत राहणार", असं मिशेक म्हणाले. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या वैवाहिक जीवनाविषयीदेखील अनेक गोष्टींचा खुलासा केला.

पुढे ते म्हणतात, "आमचं कुटुंब प्रचंड मोठं आहे. मला १५१ मुलं आहेत आणि सध्या दोन पत्नी पुन्हा गर्भवती आहेत. त्यामुळे माझ्या कुटुंबाचा आणखी विस्तार होईल. मोठं कुटुंब असल्यामुळे आर्थिक नियोजनदेखील त्याच पद्धतीने केलं जातं. माझी मुलंच आता कमवतात. माझ्या सगळ्या पत्नी स्वयंपाक करतात, त्यामुळे आमच्याकडे सगळं आनंदी वातावरण आहे."

दरम्यान, मिशेन यांनी मृत्यूपूर्वी १०० लग्न आणि १ हजार मुलं असावीत असा निर्धार केला आहे. त्यामुळे ते एकावर एक लग्न करत असल्याचं 'डेली मेल'च्या वृत्तात म्हटलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com