esakal | श्रीलंका अध्यक्षपद निवडणूक; दीड कोटी नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क
sakal

बोलून बातमी शोधा

श्रीलंका अध्यक्षपद निवडणूक; दीड कोटी नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क

- श्रीलंकेच्या अध्यक्षपदासाठी आज मतदान होत आहे. 

श्रीलंका अध्यक्षपद निवडणूक; दीड कोटी नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क

sakal_logo
By
वृत्तसंस्था

कोलंबो : श्रीलंकेच्या अध्यक्षपदासाठी आज मतदान होत आहे. देशातील सुमारे दीड कोटी नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. देशातील 35 उमेदवार आपले नशिब आजमावत आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात अनेक ठिकाणी चोख सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरवात झाली. आता या निवडणुकीचा निकाल येत्या सोमवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. या देशात निवडणुकीत पहिल्यांदाच बॅलेट पेपरचा वापर करण्यात आला. या निवडणुकीसाठी 60 हजार पोलिस कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले.

काळ्या पैशांबाबत लवकरच होणार 'ही' घोषणा

तसेच 4 लाख निवडणूक अधिकारी मतदान केंद्रावर कार्यरत असणार आहेत. याशिवाय सिव्हिल डिफेन्स फोर्सच्या कर्मचाऱ्यांचीही कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी विविध ठिकाणी नेमणूक करण्यात आली आहे.