चीनच्या आश्वासनाचा बळी पडला ‘हा’ देश; १५ महिन्यांत चौथ्यांदा TikTok Ban हटवला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tiktok

चीनने दिलेल्या आश्वासनानंतर TikTok Ban हटवला; चौथ्यांदा निर्णय

चीनने काढलेले टिकटॉक हे ॲप अल्पावधीतच लोकप्रिय झाले. अनेक देशातील युवावर्ग याचा वापर करताना पाहायला मिळत होते. चीनसोबत बिघडलेल्या संबंधानंतर भारतात याला बॅन करण्यात आले. कोरोनाचा चीनमधून प्रसार झाल्याचे समजताच अनेक देशांनी चिनी ॲप्सवर बंदी घातली होती. यात पाकिस्तानचाही समावेश होता. मात्र, आता पाकिस्तानने टिकटॉकवरून बंदी हटवली आहे.

चीन आणि पाकिस्तानचे संबंध चांगले आहे. भारताचे चीनशी संबंध चांगले नाही. याचाच फायदा घेण्यासाठी चीन भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानची बाजू घेत असतो. पाकिस्तानला मदत करण्यापासून शस्त्र पुरवीत असतो. एकप्रकारे पाकिस्तान चीनच्या दबावात असल्याचे पाहायला मिळते. यामुळेच ही बंदी उठवली की काय, अशा प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहे.

हेही वाचा: बीजिंग २०२२ हिवाळी ऑलिम्पिकवर राजनीतिक बहिष्कार! चीन म्हणाला...

पाकिस्तानच्या मीडिया नियामक प्राधिकरणाने शुक्रवारी टिकटॉकवरील बंदी उठवली आहे. चार महिन्यांनी पाकिस्तानने हा निर्णय घेतला आहे. मागच्या १५ महिन्यांत पाकिस्तानच्या दूरसंचार प्राधिकरणाने टिकटॉकवर बंदी घालण्याची आणि काढून टाकण्याची ही चौथी वेळ आहे. यामुळे यंदा उठवलेली बंदी किती दिवस कायम राहते, हेच पाहणे आता बाकी आहे.

किशोर आणि तरुणांमध्ये लोकप्रिय असलेल्या टिकटॉकवर पाकिस्तानने ऑक्टोबर २०२० मध्ये पहिल्यांदा बंदी घातली. ॲपवरील सामग्री अनैतिक, अश्लील आणि असभ्य असल्याचे आढळून आल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने ही बंदी घातल्याचे पाकिस्तानने म्हटले होते. टिकटॉकने पाकिस्तानला आश्वासन दिले की, ते बेकायदेशीर सामग्री अपलोड करणाऱ्या वापरकर्त्यांना विरोध करेल. यानंतर बंदी उठवण्याचा पाकिस्तानने निर्णय घेतल्याचे समजते.

हेही वाचा: श्रद्धा आर्याने घातलेल्या राखाडी साडीची किंमत माहितीये?

शेकडो तक्रारी

चीनच्या ByteDance कंपनीचे टिकटॉक हे ॲप तयार केले आहे. पाकिस्तानात सुमारे ३.९ कोटी वेळा हे ॲप डाउनलोड करण्यात आले आहे. काही वर्षांत पाकिस्तानने फेसबुक आणि ट्विटरवर त्यांच्या सामग्रीबद्दल शेकडो तक्रारी पाठवल्या आहेत. त्यांनी आरोप केला की ॲपवरील साहित्य आक्षेपार्ह आणि संभाव्यतः इस्लामचा आणि पाकिस्तानी कायद्याच्या विरोधात आहे. भारतात टिकटॉकवर बंदी आहे.

loading image
go to top