
पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये १७ वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लूएन्सरची सोमवारी रात्री हत्या करण्यात आली. घरात घुसून गोळी झाडून करण्यात आलेल्या या हत्येमुळे खळबळ उडाली आहे. सना युसुफ असं १७ वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचं नाव आहे. ऑनर किलिंगचा हा प्रकार असल्याचं म्हटलं जात आहे.