esakal | टॉम अँड जेरीचे दिग्दर्शक जीन डाइच यांचे वयाच्या ९५व्या वर्षी निधन
sakal

बोलून बातमी शोधा

Tom and Jerry Popeye director Gene Deitch dies at 95 in Prague

प्रसिद्ध टॉम अँड जेरी सिरिजचे दिग्दर्शक जीन डाइच यांचे वयाच्या ९५व्या वर्षी निधन झाले. ऑस्कर पुरस्कार विजेते रेखाचित्रकार आणि टॉम अ‍ॅन्ड जेरीचे दिग्दर्शक जीन डाइच यांचे निधन झाले. चेक प्रजासत्ताकमधील प्राग शहरात त्यांची प्राणज्योत मालवली.

टॉम अँड जेरीचे दिग्दर्शक जीन डाइच यांचे वयाच्या ९५व्या वर्षी निधन

sakal_logo
By
वृत्तसंस्था

प्राग : प्रसिद्ध टॉम अँड जेरी सिरिजचे दिग्दर्शक जीन डाइच यांचे वयाच्या ९५व्या वर्षी निधन झाले. ऑस्कर पुरस्कार विजेते रेखाचित्रकार आणि टॉम अ‍ॅन्ड जेरीचे दिग्दर्शक जीन डाइच यांचे निधन झाले. चेक प्रजासत्ताकमधील प्राग शहरात त्यांची प्राणज्योत मालवली.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

डाइच यांना उत्कृष्ट लघु अ‍ॅनिमेशनपटासाठी १९६० मध्ये मुन्रोच्या रूपाने ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. याच प्रवर्गात त्यांना १९६४ मध्ये हिअर इज नुडिक व हाउ टू अ‍ॅव्हॉइड फ्रेंडशिप या अ‍ॅनिमेशनपटांसाठी नामांकन मिळाले होते. सिडनीज फॅमिली ट्री या मालिकेचे ते सहनिर्माते होते त्यासाठी त्यांना १९५८ मध्ये ऑस्कर नामांकन मिळाले होते.

लॉकडाऊन असताना गेले मॉर्निंग वॉकला अन्...

दरम्यान, चेक प्रजासत्ताकमधील जीन यांचे प्रकाशक पीटर हिमेल यांनी डाइच यांच्या मृत्यूच्या वृत्तास दुजोरा दिला. डाइच यांचा जन्म ८ ऑगस्ट १९२४ रोजी शिकागोत झाला, त्यांचे पूर्ण नाव युजीन मेरिल डाइच असे होते. त्यांनी काही लोकप्रिय अ‍ॅनिमेशन पटांचे दिग्दर्शन केले. त्यात, पॉपिये द सेलर मॅन, मुन्रो, टॉम टेरिफिक अँड नुडनिक यांचा समावेश होता. त्यांनी टॉम अँड जेरीच्या १३ भागांचे दिग्दर्शन केले. पॉपिये द सेलर मालिकेतील अनेक भाग त्यांनी दिग्दर्शित केले होते. १९५९ मध्ये ते प्राग येथे दहा दिवसांच्या दौऱ्यावर आले असता झडेन्का हिच्या प्रेमात पडले, तिच्याशी विवाह करून ते प्राग येथे स्थायिक झाले होते.

 

loading image