esakal | अरे व्वा! पर्यटक १५ जुलैपासून या बेटाला भेट देऊ शकतात
sakal

बोलून बातमी शोधा

maldives

मालदिव येथे २४१० बाधित
मालदिव येथे आतापर्यंत कोविड-१९ चे २४१० रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी १९७६ बरे झाले असून ४२४ जणांवर उपचार सुरू आहेत. तसेच दहा जणांचा मृत्यू झाला आहे. मालदिव येथे पहिला रुग्ण ७ मार्चला सापडला होता. त्यानंतर १५ एप्रिलला ग्रेटर माले भाग संपूर्णपणे लॉकडाउन केला होता.

अरे व्वा! पर्यटक १५ जुलैपासून या बेटाला भेट देऊ शकतात

sakal_logo
By
वृत्तसंस्था

माले - कोरोना संसर्गामुळे चार महिन्यांपासून बंद असलेले मालदिव आता पर्यटकांसाठी खुले होत आहे. मालदिव सरकारने हिंदी महासागरातील देशांसाठी सीमा खुल्या करण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार १५ जुलैपासून पर्यटक मालदिवला भेट देऊ शकतात. अध्यक्ष इब्राहिम मोहंमद सोलिह यांनी यासंदर्भात नुकतीच घोषणा केली आहे. संशयित किंवा बाधित रुग्णांनी मालदिवला भेट देऊ नये, असे आवाहन मालदिव सरकारने केले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पर्यटन मंत्रालयाच्या गाइडलाइननुसार येत्या १५ जुलैपासून बेट, रिसॉर्ट, मरिनाज, हॉटेल्स, रेस्टॉरंट सुरू केल जाणार आहे. त्याचवेळी बेटावरील गेस्ट हाऊस आणि हॉटेल एक ऑगस्टपासून सुरु होत आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मालदिव २७ मार्चपासून बंद आहे. त्याचा थेट परिणाम पर्यटन व्यवसायावर झाला आहे. अध्यक्ष सोलिह यांनी कोविड-१९ नंतर देशात जनजीवन सुरळीत करण्यासंदर्भात आणि व्यवहार सुरू करण्याबाबत सरकारच्या भविष्यातील योजना जाहीर केल्या आहेत.

....म्हणून अमेरिका, ब्राझील अन् युरोपात कोरोना संक्रमणाचा वेग सर्वाधिक

येत्या पंधरा जुलैपासून आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी मालदिवच्या सीमा खुल्या होत असून त्यांच्या स्वागतासाठी रिसॉर्ट सुरू करण्यास सरकार परवानगी देत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे देशातील पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल. काही अटींवरच हॉटेल व्यवसाय सुरू केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचवेळी शाळा सुरू करण्याचेही सूतोवाच त्यांनी केले आहे. रेस्टॉरंट आणि कॅफे येथे डाइन इन सेवा दिली जाण्याची शक्यता आहे. ऑगस्टमहिन्यात गेस्ट हाउस देखील सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

loading image