....म्हणून अमेरिका, ब्राझील अन् युरोपात कोरोना संक्रमणाचा वेग सर्वाधिक

 corona infection, America, Brazil,Europe
corona infection, America, Brazil,Europe

नवी दिल्ली : चीनच्या वुहानमधून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूचा सर्वाधिक फटका हा अमेरिकेला बसलाय. युरोपीय राष्ट्रानंतर अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा हा वेगाने वाढत आहे. ब्राझीलमध्येही दिवसागणिक आकडा वाढत असून ते दुसऱ्या स्थानावर आहेत. या दोन्ही राष्ट्रामध्ये प्रत्येक दिवशी 50 हजारहून अधिक रुग्ण आढळत आहेत. या राष्ट्रात वेगाने संक्रमण होण्यामागचे कारण शास्त्रज्ञांनी शोधून काढले आहे. कोरोना विषाणूचे बदललेले रुप ‘जी614’ याला कारणीभूत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कोरोना विषाणूची लागण झालेला आकडा हा वाढत असला तरी मृत्यूदर कमी झाला आहे, असा उल्लेखही करण्यात आलाय. 

आंतरराष्ट्रीय संशोधकांचा यासंदर्भातील अहवाल सेल पत्रिकेमध्ये प्रसिद्ध झालाय. कोरोनाने आपले रुप बदलल्यामुळे युरोप अमेरिका आणि ब्राझीलमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने झाला. सुरुवातीच्या काळात कोरोना विषाणूमुळे अनेक लोकांनी जीव गमावले होते. पण या नव्या रुपात कोरोनाचा जीवाला अधिक धोका नाही, असा उल्लेखही या अहवालातून करण्यात आलाय. अमेरिकेतील लॉस अलामॉस नॅशनल लॅबोरेटरीतील या संशोधनाच्या अध्यनातील प्रमुख लेखक  बेट कोर्बर यांच्या मते,  कोविड-19 विषाणूमध्ये  परिवर्तन (म्यूटेशन) क्षमता आहे। एप्रिलच्या सुरुवातीच्या काळात विषाणूमध्ये अनुवांशिक अनुक्रम परिवर्तन झाल्याचे आढळले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विषाणूच्या पहिल्या रुपात 'डी614' मध्ये आश्चर्यकारक बदल होत आहे. यासंदर्भात मानवी आणि पशुंच्या पेशीतील परिवर्तनासंदर्भातील अभ्यासावरुन हा निष्कर्ष काढण्यात आलाय. प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या अभ्यासात कोरोना विषाणूचे नवे रुप ‘जी614’ असल्याचे दिसून आले असून यामुळे त्याचा प्रसार वेगाने होत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. कोरोना विषाणूचे पुर्वीचे रुप ‘डी614’ पेक्षा नव्या रुपातील ‘जी614’ कोरोना विषाणू तीन ते नऊ पट्ट अधिक वेगाने पसरतो, असा दावा  कॅलिफोर्नियातील ला जोला इंस्टीट्यूट फॉर इम्यूनोलॉजीचे शास्त्रज्ञ आणि प्रमुख संशोधक एरिका ओल्मन सैफायर यांनी केलाय. मार्चच्या सुरुवातील हा विषाणू युरोपात होता. आता कोरोना नव्या रुपात ब्राझील आणि अमेरिकेत पसरला आहे, असेही ते म्हणाले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com