आताच करार करा; अन्यथा महागात पडेल : ट्रम्प 

वृत्तसंस्था
सोमवार, 13 मे 2019

चीनने अमेरिकेबरोबर आताच व्यापार करार करावा; अन्यथा माझ्या दुसऱ्या कार्यकालात हाच करार त्यांना फार महागात पडेल, असा इशारा अमेरिकचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज दिला.

वॉशिंग्टन : चीनने अमेरिकेबरोबर आताच व्यापार करार करावा; अन्यथा माझ्या दुसऱ्या कार्यकालात हाच करार त्यांना फार महागात पडेल, असा इशारा अमेरिकचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज दिला.

अमेरिका-चीनमधील व्यापार युद्धामुळे जागतिक व्यापारावरही परिणाम होत आहे. या दोन्ही देशांमधील दोन दिवस सुरू असलेली चर्चा नुकतीच संपली आणि यातून काहीही तोडगा निघाला नाही. पुढील चर्चेतही आपण आपल्या अटींवर तडजोड करणार नसल्याचे चीनने स्पष्ट केले. त्यावर आज ट्रम्प यांनी हा इशारा दिला.

"चीनला वाटत असेल कदाचित पुढील निवडणुकीत माझा पराभव होऊन डेमोक्रॅट सत्तेवर येतील. मात्र, पुढील निवडणुकीतही मीच विजयी होणार आहे आणि त्यानंतर चीनला अमेरिकेशी करार करणे महागात पडेल,' असे ट्रम्प म्हणाले. 

Web Title: Trade Deal Now Or It Will Be Far Worse After 2020 Donald Trump To China