भारत-पाकिस्तान सीमेच्या १० किमी परीघात प्रवास टाळा; अमेरिकेची त्यांच्या नागरिकांसाठी अॅडवायजरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

joe biden america us

गुन्हेगारी आणि सांप्रदायिक हिंसाचाराचा दाखला देत भारतात जाणाऱ्यांनी काळजी घेण्यासही सांगितलं आहे.

भारत-पाकिस्तान सीमेच्या १० किमी परीघात प्रवास टाळा - अमेरिका

sakal_logo
By
टीम ई सकाळ

अमेरिकेने भारत आणि पाकिस्तानमध्ये प्रवास करणाऱ्या त्यांच्या नागरिकांसाठी दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील ट्रॅव्हल अॅडव्हायजरी जारी केली आहे. अॅडव्हायजरीमध्ये अमेरिकेने दहशतवादी आणि सांप्रदायिक हिंसेचा दाखला दिला आहे. अमेरिकेच्या प्रशासनाने त्यांच्या नागरिकांना पाकिस्तानमध्ये प्रवास करण्याआधी पुन्हा एकदा विचार करा असं सांगितलं आहे. तसंच गुन्हेगारी आणि सांप्रदायिक हिंसाचाराचा दाखला देत भारतात जाणाऱ्यांनी काळजी घेण्यासही सांगितलं आहे.

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने एख अॅडव्हायजरी जारी करून त्यांच्या नागरिकांना दहशतवाद्यांचा धोका आणि नागरिकांमध्ये असलेल्या असंतोषामुळे काश्मीरमध्ये संघर्षाची भीती व्यक्त करत भारत पाकिस्तानच्या सीमेत १० किमी परिसरात प्रवास न करण्याचा सल्ला दिला आहे.

अमेरिकेनं त्यांच्या अॅडव्हायजरीमध्ये म्हटलं आहे की, भारतीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारतात वेगाने वाढणाऱ्या गुन्ह्यांमध्ये बलात्कार हे सर्वाधिक होत आहेत. लैंगिक शोषण, हिसांचार इत्यादी पर्यटनस्थळी झाल्याचे प्रकार घडले आहेत. दहशतवादी कोणत्याही इशाऱ्याशिवाय पर्यटन स्थळी, बसस्थानके, बाजारात हल्ला करू शकतात.

loading image
go to top