esakal | काय सांगता! पाकिस्तानच्या न्यूज चॅनलवर झळकला तिरंगा
sakal

बोलून बातमी शोधा

tricolour.jpg

पाकिस्तानमधील प्रमुख टेलिविजन वृत्त वाहिनी 'डॉन'वर अचानक तिरंगा झेंडा दिसल्याने सगळ्यांना आश्चर्यचकित केले.

काय सांगता! पाकिस्तानच्या न्यूज चॅनलवर झळकला तिरंगा

sakal_logo
By
वृत्तसंस्था

इस्लामाबाद- पाकिस्तानमधील प्रमुख टेलिविजन वृत्त वाहिनी 'डॉन'वर अचानक तिरंगा झेंडा दिसल्याने सगळ्यांना आश्चर्यचकित केले. तपास केल्यानंतर कळाले की वृत्त वाहिनीवर हॅकर्सनी सायबर हल्ला केला होता. या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागले आहेत. 

कोविड पॉझिटिव्ह अमित शहांनी काही दिवसांपूर्वी घेतली होती अडवाणींची भेट

रविवारी दुपारी वृत्त वाहिनीवर फडकला तिरंगा

रविवारी दुपारी साडेतीन वाजता पाकिस्तानच्या डॉन वृत्त वाहिनीवर जाहीरात दाखवली जात होती. याच दरम्यान टीव्ही पडद्यावर अचानक तिरंगा फडकू लागला. त्यावर हॅपी इंडिपेंडेंस डेचा मेसेजही लिहण्यात आला होता. त्यामुळे सगळ्या प्रेक्षकांना धक्का बसला. प्रेक्षकांना नेमकं काय होतंय हेच कळालं नाही. 

डॉन वृत्त वाहिनीची प्रतिक्रिया

डॉन न्यूजकडून वक्तव्य जारी करण्यात आलं आहे. रविवारी डॉन वृत्त वाहिनी नेहमीप्रमाणे प्रसारित होत होती. मात्र, अचानक भारतीय ध्यज आणि हॅपी इंडिपेंडेंसचा मेसेज टीव्ही पडद्यावर झळकू लागला. काही काळापर्यंत हा प्रकार सुरु होता, त्यानंतर पडद्यावरुन भारतीय ध्वज गायब झाला. या प्रकरणाचा आम्ही तपास करत आहोत, अशी प्रतिक्रिया डॉनकडून देण्यात आली आहे.
वाहिनीवर किती काळापर्यंत हा व्हिडिओ प्रसारित होत होता याची माहिती मिळालेली नाही. डॉनने म्हटलं आहे की, या प्रकणाच्या चौकशीची आदेश देण्यात आले आहेत. अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचल्यानंतर आम्ही प्रेक्षकांना याबाबत सूचित करु.

लॉकडाउनमध्ये ब्रिटनवासियांसाठी 'भांगडा' नृत्य ठरले ऊर्जेचा स्त्रोत

दरम्यान, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचा स्वातंत्र्यादिन जवळ येत आहे. शिवाय 5 ऑगस्ट रोजी पाकिस्तान काळा दिवस पाळणार आहे. 2019 मध्ये याच दिवशी भारताने जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतला होता. भारताच्या या कृतीचा विरोध म्हणून पाकिस्तान काळा दिवस पाळत आहे. या दिवशी पाकिस्तानमध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पाकिस्तानच्या सर्व वाहिन्या या दिवशी आपला लोगो काळ्या रंगात दाखवणार आहेत.  शिवाय या दिवशी पाकिस्तानचे सर्व वर्तमानपत्रे काश्मीरविषयी एक विशेष लेख छापणार आहेत. तसेच वृत्त वाहिन्या विशेष कार्यक्रमांचे आयोजन करणार आहेत.  

(edited by-kartik pujari)

loading image