Donald Trump: धोरणी प्रश्नांवर ट्रम्प संतापले! महिला पत्रकाराला ‘परवाना रद्द’ करण्याची धमकी
Trump Labels the Network as “ABC Fake News”: अमेरिका–सौदी संयुक्त पत्रकार परिषदेत महिला पत्रकाराच्या कठोर प्रश्नांनी ट्रम्प संतप्त; एबीसी न्यूजचा परवाना रद्द करण्याची धमकी. व्यवसायिक स्वार्थ, पत्रकार हत्या आणि ९/११ पार्श्वभूमीवर विचारलेले प्रश्न दोन्ही नेत्यांना अडचणीत आणणारे ठरले.
सौदी अरेबियाचे युवराज महंमद बिन सलमान यांच्याबरोबरील संयुक्त पत्रकार परिषदेवेळी एका वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकाराने अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युवराज महंमद यांना अडचणीत आणणारे प्रश्न विचारल्याने ट्रम्प यांनी संताप व्यक्त केला.