
वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारच्या फेररचना योजनेचा फटका परराष्ट्र मंत्रालयालाही बसला आहे. या मंत्रालयातील तेराशेपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. या कर्मचाऱ्यांना शुक्रवारी (ता.११) ईमेलवर नोटीस पाठवून कामावरून काढल्याचे सांगण्यात आले.