US
US

मोठी बातमी : ट्रम्प प्रशासनाने व्हिसाच्या नियमात केले बदल; नवे नियम...

मुंबई : अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने गरोदर महिलांसाठी व्हिसासंदर्भात नवीन नियम आणले आहेत. बर्थ टुरिझम रोखण्यासाठी हे नियम लागू करण्यात आले असल्याचे ट्रम्प प्रशासनाचे म्हणणे आहे.

बर्थ टुरिझम म्हणजे जर एखादी महिला जर अमेरिकेत जाऊन आपल्या अपत्याला जन्म देणार असेल, जेणेकरून त्या अपत्याला अमेरिकेचे पासपोर्ट म्हणजेच अमेरिकेचे नागरिकत्व आपोआपच मिळेल, तर अशा प्रकारच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी हे नवे नियम आणण्यात आले आहे.

दूतावासातील अधिकाऱ्यांना जर असे जाणवले की, अमेरिकन व्हिसासाठी अर्ज केलेली महिला अमेरिकेत जाऊन अपत्याला जन्म देणार आहे, तर फेडरल रजिस्टरच्या नियमानुसार त्या अर्जदाराला प्रवासी व्हिसा नाकारण्यात येणार आहे. एखादी महिला ही वैद्यकीय मदत घेण्यासाठी किंवा वैद्यकीय कारणास्तव अमेरिकेत जाते आहे, तिथे जाऊन फक्त अपत्याला जन्म देणे हाच हेतू या प्रवासामागे नाही? हे अमेरिकन दूतावासातील अधिकाऱ्यांना पटवून देणे ही खूप अवघड बाब ठरणार आहे.

ज्या परदेशी नागरिकांना अमेरिकेत वैद्यकीय उपचार घ्यायचे असतील त्यांना हे सिद्ध करावे लागेल की, त्या वैद्यकीय उपचारासाठीचे शुल्क भरण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे आहेत. यात प्रवास आणि राहण्याचा खर्च यांचाही समावेश असणार आहे. अमेरिकेत जाऊन अपत्याला जन्म देणे हे तसे मूलभूत अधिकारांनुसार योग्यच आहे.

अर्थात, बर्थ टुरिझमसाठी व्हिसाशी संबंधित गैरव्यवहार किंवा कर चुकवेगिरीची काही प्रकरणेही अमेरिकन प्रशासनाने नोंदवून त्यात अशा प्रकारच्या एजन्सींच्या चालकांना अटकही केलेली आहे. ट्रम्प प्रशासन सर्व प्रकारच्या स्थलांतराला आळा घालते आहे. मात्र, अमेरिकेच्या संविधानानुसार ज्या व्यक्तीचा जन्म अमेरिकेत झाला आहे, अशी व्यक्ती अमेरिकेची नागरिक ठरते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com