Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, एक वर्ष आधीच ओसामा बिन लादेनबाबत सतर्क राहण्याचा इशारा दिला होता
Osama Bin Laden :डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की ९/११ हल्ल्याच्या एक वर्ष आधी त्यांनी ओसामा बिन लादेनबा बत इशारा दिला होता. अमेरिकेच्या नौदलाच्या २५० व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात ट्रम्प यांनी हा दावा केला.
न्यूयॉर्क/वॉशिंग्टन : ‘‘अमेरिकेवर ओसामा बिन लादेनने घडवून आणलेल्या ९/११ हल्ल्याच्या एक वर्ष आधीच मी याबाबत इशारा दिला होता,’’ असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.