Donald Trump: सात युद्धे थांबविली, मला नोबेल द्या : डोनाल्ड ट्रम्प
Trump Statements: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सात युद्धे थांबविल्याचा दावा केला आहे आणि त्यामुळे त्यांना शांततेचे नोबेल मिळवायला हवे, अशी मागणी केली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष थांबवण्यात अमेरिकेने मध्यस्थी केली, असा ट्रम्प यांचा दावा आहे.
न्यूयॉर्क : भारत व पाकिस्तान यांच्यातील संघर्ष थांबविल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज पुन्हा एकदा करतानाच, ‘मी जगातील सात युद्ध थांबविल्याने मला शांततेचे नोबेल मिळायला हवे’, अशी मागणी केली.