
वॉशिंग्टन : जपानमधून आयात होणाऱ्या वस्तू आणि सेवांवरील शुल्कात घट करून तो १५ टक्क्यांवर आणणारा व्यापार आराखडा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज जाहीर केला. या व्यापार करारामुळे अमेरिकेत हजारो नोकऱ्या निर्माण होतील, असा दावा ट्रम्प यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केला आहे.