ट्रम्प प्रशासनाच्या एका निर्णयाने येमेनमध्ये तडफडून मरतायत लहान मुलं

सकाळ वृत्तसेवा
Monday, 21 September 2020

अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयाचा फटका येमेनमधील लहान मुलांना बसत असून तिथे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.

सना - अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयाचा फटका येमेनमधील लहान मुलांना बसत असून तिथे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. येमेन इथल्या एबीएस रुग्णालयातील कुपोषित वॉर्डमधील डॉक्टर आणि नर्स यांना लहान मुलं ओरडत, पाय आपटताना दिसतात. रुग्णालयातील एकही दिवस असा जात नाही की ज्या दिवशी दुबळी आणि कुपोषित मुलं उपचारासाठी येत नसतील. याआधी अशी परिस्थिती कधीच नव्हती.

गेल्या काही महिन्यांमध्ये वीज आणि इंधन दरात झालेल्या वाढ झाली आहे. त्यामुळे गेल्यानंतर जनरेटर सतत सुरु ठेवणं खर्चिक ठरत आहे. मुलांना लावलेले मॉनिटर, व्हेटिंलेटर वीज गेल्यानं बदं होतात. यामुळेच जी मुलं वाचू शकतात त्यांच्यावर मृत्यू ओढवतो.

येमेनची राजधानी सनाच्या उत्तर पश्चिम भागात हज्जाह हॉस्पिटल आहे. तिथल्या डॉक्टरांनी सीएनएनशी बोलताना सांगितलं की, जे लोक युद्धातून वाचले ते वैद्यकीय संसाधने अपुरी पडल्यानं मृत्यूमुखी पडली आहेत. अशा परिस्थितीत ट्रम्प प्रशासनाला जबाबदार धरलं जात आहे. ट्रम्प प्रशासनाने मार्च महिन्यात अमेरिका आणि मध्य पूर्वेकडील सहकारी देश सौदी अरब आणि युएईने येमेनला देण्यात येणाऱ्या निधीत कपात केली आहे. 

हे वाचा - अमेरिकेची ‘दबंग’शाही; इराणवर पुन्हा निर्बंध

संयुक्त राष्ट्राने अमेरिका आणि त्यांच्या सहकारी राष्ट्रांना विनंती केली की त्यांनी येमेनला मदत करावी. येमेनच्या निधीत कपात केली जाण्याने इथल्या नागरिकांच्या आरोग्य सुविधांवर मोठा परिणाम दिसून येत आहे. निधी कमी झाल्यानं अनेक रुग्णालये बंद कऱण्याची वेळ आली आहे. तसंच अनेक संस्थांना अन्न पुरवठा नाईलाजाने कमी करावा लागत आहे. 

निधी कमी झाल्यानं येमेनमधील मोठं रुग्णालय असलेल्या एबीएसवर भार पडला आहे. वर्षातील पहिल्या सहामाहीमध्ये जवळपास 700 कुपोषित आढळले. तर ऑगस्ट महिन्यात याचे प्रमाण दुपटीने वाढले. डॉक्टर अल अश्वाल यांनी सांगितलं की आमच्या क्लिनिक मध्ये 100 ते 150 रुग्ण यायचे आता ऑगस्टमध्ये हेच प्रमाण 300 वर पोहोचले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: trump cuts yemen funds effect on health system increases child deaths