Donald Trump: अमेरिकेत ट्रम्प यांचा थेट कारवाईचा निर्णय; रोजगार आकडेवारीवरून बीएलएस प्रमुखांना दिली हकालपट्टी
US Politics: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रोजगार अहवालात फेरफार झाल्याचा आरोप करत बीएलएस प्रमुख एरिका मॅकएंटरफर यांना पदच्युत केले. आकडेवारीत राजकीय हस्तक्षेप केल्यास गंभीर आर्थिक संकट ओढवते, ग्रीस व चीनच्या उदाहरणांतून हे स्पष्ट होते.
वॉशिंग्टन : अमेरिकेची रोजगारक्षमता घटल्याचे वास्तव अहवालातून दाखवून देणाऱ्या ‘ब्युरो ऑफ लेबर स्टॅटिस्टिक्स’च्या (बीएलएस) प्रमुख एरिका मॅकएंटरफर यांची अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तडकाफडकी हकालपट्टी केली.