
न्यूयॉर्क/वॉशिंग्टन, ता. १ (पीटीआय) : ‘‘भारताने आयातशुल्क शून्यापर्यंत कमी करण्याची ऑफर अमेरिकेला दिली आहे; पण आता उशीर झाला आहे,’’ असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी (ता. १) केला. भारत बहुतांश तेल आणि संरक्षण उत्पादने रशियाकडून खरेदी करतो; अमेरिकेकडून नाही, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.