

Donald Trump
sakal
न्यूयॉर्क/वॉशिंग्टन : ‘‘भारत आणि पाकिस्तानवर ३५० टक्के दंडात्मक आयातशुल्क लादण्याची धमकी दिल्यानंतरच दोन्ही देशांतील तणाव थांबला,’’ या विधानाचा पुनरुच्चार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. ही धमकी दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आम्ही युद्ध करणार नाही,’ असे फोनवरून मला सांगितले, असेही ट्रम्प म्हणाले.