US Iran ceasefire : इराणने डोनाल्ड ट्रम्प यांची शस्त्रसंधी धुडकावली; हॉर्मुझमध्ये गोळीबार, भारताकडे येणारे जहाज IRGC ने घेतले ताब्यात

IRGC Ships Targeted : भारताकडे येणारे एक जहाज जप्त करून इराणमध्ये नेले. इराणने शस्त्रसंधीला नकार देत अमेरिकेच्या नाकेबंदीला "युद्धकृत्य" म्हटले आणि होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याची धमकी दिली.
Tensions escalate in the Strait of Hormuz as Iranian forces reportedly target and seize multiple vessels amid ongoing US-Iran conflict.

Tensions escalate in the Strait of Hormuz as Iranian forces reportedly target and seize multiple vessels amid ongoing US-Iran conflict.

esakal

Updated on

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. शांतता वाटाघाटी पूर्ण होईपर्यंत हा शस्त्रसंधी लागू राहील, असे त्यांनी म्हटले आहे. पण इराणच्या बंदरांवरील अमेरिकेची नाकेबंदी उठवली जाणार नाही, हेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले. या घोषणेनंतर लगेचच होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये एक खळबळजनक घडामोड घडली. युनायटेड किंगडम मेरिटाइम ट्रेड ऑपरेशन्स (UKMTO) नुसार, या भागात तीन जहाजांना लक्ष्य करण्यात आले. प्राथमिक वृत्तांनुसार, इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सने एका जहाजावर गोळीबार केला. इराणी माध्यमांच्या वृत्तानुसार, इतर दोन जहाजांवर आयआरजीसीने हल्ले केले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com