

Ayatollah Ali Khamenei amid heightened US–Iran tensions as reports suggest his relocation to a secure underground bunker while American naval forces advance.
इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. दरम्यान, इराणी सुरक्षा अधिकाऱ्यांना अमेरिकेच्या संभाव्य हल्ल्याची भीती असल्याने सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी तेहरानमध्ये भूमिगत होऊन एका बंकरमध्ये लपल्याचे वृत्त समोर येत आहे. इराण इंटरनॅशनलच्या मते, खामेनी यांना अनेक परस्पर जोडलेले बोगदे आणि प्रगत सुरक्षा उपकरणांनी सुसज्ज असलेल्या सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.