

Donald Trump and Israeli Prime Minister Benjamin Netanyahu
esakal
Trump Signals Policy Shift on Iran Conflict : इराणसोबतच्या संभाव्य युद्धाबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका बदलताना दिसत आहे. ज्या मित्रराष्ट्रासोबत मिळून त्यांनी एकेकाळी इराणला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला होता, त्याच मित्रराष्ट्राला ते आता इशारे देत आहेत. वास्तविक, डोनाल्ड ट्रम्प आणि बेंजामिन नेतान्याहू यांच्यातील संबंध सध्या तणावपूर्ण आहेत. इराणसोबतच्या संघर्षाबाबत स्वतःचा अजेंडा राबवणाऱ्या नेतन्याहू यांना ट्रम्प यांनी इशारा दिला आहे की, जर इस्रायलने इराणविरुद्ध युद्ध सुरू केले, तर त्यांना एकट्याने लढावे लागू शकते.यापूर्वी अमेरिकेने इराणवरील हल्ल्यात इस्रायलची साथ दिली होती.