
White House Planning Huge Ballroom While Federal Shutdown Looms
Esakal
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे राजकारणात येण्याच्या आधीपासून एक बिझनेसमन आहेत. त्यांनी रिअल इस्टेटमध्ये स्वत:ची वेगळी अशी ओळख निर्माण केलीय. गगनचुंबी इमारती आणि लग्झरी प्रोजेक्ट्स उभारणं हा त्यांचा मूळ व्यवसाय आणि आवड आहे. ट्रम्प यांनी नेहमीच व्हाइट हाऊसला स्वत:च्या मनासारखं बनवायचं होतं. २०२४ची निवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी यासाठी आराखडाही तयार केला. एक ग्रँड बॉलरूम म्हणजेच डान्स हॉल बनवण्याची त्यांची योजना होती. यात एकाच वेळी किमान एक हजार लोक एकत्र येऊ शकतील असा हा प्लॅन आहे.