इराणमध्ये २००० मृत्यू, ट्रम्प-नेतन्याहू मारेकरी; अमेरिकेनं ऐनवेळी बैठक रद्द केल्यानं भडकले इराणचे NSC

Iran vs America : इराणचे राष्ट्रीय सुरक्षा प्रमुख अली लारीजानी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू हे इराणी जनतेचे प्रमुख मारेकरी असल्याचं म्हटलंय.
Iran NSC Blames America And Israel For 2000 Deaths

Iran NSC Blames America And Israel For 2000 Deaths

Esakal

Updated on

इराणमध्ये सरकार विरोधात आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानं आतापर्यंत २ हजार पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. यानंतर आता आरोप प्रत्यारोप केले जात आहे. इराणचे राष्ट्रीय सुरक्षा प्रमुख अली लारीजानी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू हे इराणी जनतेचे प्रमुख मारेकरी असल्याचं म्हटलंय. इराणमध्ये होत असलेल्या रक्तपाताविरोधात इराणी अधिकाऱ्यांसोबतची बैठक ट्रम्प यांनी रद्द केल्यानंतर आणि आंदोलकांना सरकारी संस्था ताब्यात घेण्याचं आवाहन केल्यानंतर लारीजानी यांनी संताप व्यक्त केलाय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com