

Donald Trump
sakal
वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अण्वस्त्रचाचण्यांबाबत नवा खुलासा केला आहे. पाकिस्तान आणि चीन अण्वस्त्रचाचण्या करीत असल्याचा दावा त्यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. रशिया आणि उत्तर कोरियाही अण्वस्त्रांच्या चाचण्या करीत आहेत. त्यामुळे आता अमेरिकाही मागे हटणार नाही, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.