
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या ‘एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट’चा (यूएसएआयडी) २.१ कोटी डॉलरचा निधी भारतालाच दिल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा सांगितले. यावेळी त्यांनी दिलेल्या निधीविषयी भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेतले. त्यामुळे या निधीवरून केंद्र सरकार आणि विरोधी पक्षांमधील शाब्दिक द्वंद्व अधिक तीव्र होणार आहे.