

Donald Trump
sakal
वॉशिंग्टन : मनमानी आयातशुल्क लावून जागतिक बाजारपेठेत अस्थिरता निर्माण करणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता भूमिकेवरून ‘यू टर्न’ घेतला आहे. गोमांस, कॉफी, उष्णकटिबंधीय फळे आणि इतर अनेक वस्तूंवरील आयातशुल्क रद्द करीत असल्याचा निर्णय ट्रम्प यांनी जाहीर केला आहे. विविध वस्तूंच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे.