‘निकाल कदाचित न्यायालयातच लागेल’

वृत्तसंस्था
Friday, 25 September 2020

कोरोना संसर्गामुळे अमेरिकेतील मतदारांचा टपालाद्वारे मतदान करण्याकडे कल वाढत आहे. ट्रम्प यांनी आधीही अनेकदा टपालाद्वारे होणाऱ्या मतदानात गैरप्रकार होण्याची शंका व्यक्त केली आहे.

वॉशिंग्टन - अध्यक्षीय निवडणूकीत पराभव झाल्यास तो सहज मान्य करून शांततेत सत्तांतर करण्यास अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज अप्रत्यक्षपणे नकार दिला. टपालाद्वारे होणाऱ्या मतदानावर शंका असल्याने निवडणुकीचा निकाल कदाचित सर्वोच्च न्यायालयातच लागेल, असे ट्रम्प यांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तीन नोव्हेंबरच्या निवडणूकीत ट्रम्प यांच्यासमोर डेमोक्रॅटिक उमेदवार ज्यो बायडेन यांचे आव्हान असून कलचाचणीमध्ये बायडेन यांचे पारडे जड झाले आहे. कोरोना संसर्गामुळे अमेरिकेतील मतदारांचा टपालाद्वारे मतदान करण्याकडे कल वाढत आहे. ट्रम्प यांनी आधीही अनेकदा टपालाद्वारे होणाऱ्या मतदानात गैरप्रकार होण्याची शंका व्यक्त केली आहे. आज पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, टपालाद्वारे होणारे मतदान ही अत्यंत चुकीची पद्धत आहे. त्याचा अडथळा दूर केला तरच सर्व योग्य होईल. मतपत्रिकांवर नियंत्रण ठेवणे अशक्य आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Trump said the outcome of the election is likely to be in the Supreme Court