Coronavirus : तोपर्यंत कोरोनावरील लस तयार करू : डोनाल्ड ट्रम्प

Trump says US to have coronavirus vaccine by end of year
Trump says US to have coronavirus vaccine by end of year
Updated on

वॉशिंग्टन : २०२० च्या अखेरपर्यंत आम्ही कोरोनावरील लस तयार करू असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. २०२० च्या शेवटापर्यंत कोरोना व्हायरसवर लस तयार करु शकत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. काल (ता. ०३) रविवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी या वर्षाच्या अखेरीस अमेरिकाकडे कोरोनावरील लस असेल असे म्हटले आहे. 

लस तयार करण्यात, इतर कोणत्याही दुसऱ्या देशाने अमेरिकी संशोधक आणि रिसर्चला मागे टाकल्यास मला त्याची चिंता नसून, कोरोनावर केवळ प्रभावी लस सापडणं गरजेचं असल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. कोरोना व्हायरसचा सर्वाधिक प्रभाव अमेरिकेत पाहायला मिळतोय. अमेरिकेत कोरोना व्हायरसमुळे सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. 

४ महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह, पत्नीशी व्हॉट्सअ‍ॅपवर झालं अखेरचं बोलणं झालं अन्...

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी ३० एप्रिल रोजी जगभरात २ लाख ३० हजारांहून अधिकांचा बळी घेणारा आणि संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था मोडकळीस आणणाऱ्या कोरोना व्हायरसची उत्पत्ती चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेतून झाली असल्याचा दावा केला होता. कोरोना व्हायरसपुढे अमेरिकेसारखा बलाढ्य देशही हतबल झाला आहे. देशात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून मृतांचा आकडाही झपाट्याने वाढत आहे. अमेरिकेत ११ लाख ८८ हजार १२२ लोक कोरोनाबाधित आहेत. तर अमेरिकेत कोरोना व्हायरसमुळे ६८ हजार २६३ लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत १ लाख ७८ हजार २६३ लोक कोरोनातून बरे झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com