Donald Trump : ट्रम्प बनणार पोप? सोशल मीडियावर फोटो व्हायरल, नेमकं काय आहे प्रकरण?
US Politics : डोनाल्ड ट्रम्प यांनी पोपच्या पोशाखात स्वतःचे AI निर्मित छायाचित्र पोस्ट करून सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे. काहींनी ही कृती विनोदी मानली, तर काहींनी ती पोपच्या निधनाची खिल्ली उडवणारी असल्याचा आरोप केला.
वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी पोप व्हायला आवडेल, असे गमतीने म्हटले होते. आता त्यांनी पोपच्या पोशाखात स्वतःचे ‘एआय’ (कृत्रिम बुद्धिमत्ता) निर्मित छायाचित्र पोस्ट केले आहे.