

US President Trump Stuns World With Venezuela Post
Esakal
गेल्या आठवड्यात अमेरिकेनं व्हेनेझुएलावर हल्ला करत राष्ट्रपती निकोलस मादुरोंसह त्यांच्या पत्नीला अटक केली होती. यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत:ला व्हेनेझुएलाचा काळजीवाहू राष्ट्रपती असल्याचं म्हटलंय. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केल्यानं चर्चेला उधाण आलं आहे. ट्रम्प यांनी टीका करण्याच्या उद्देशानं उपहासात्मक अशी पोस्ट केलीय. याआधी देशाच्या उपराष्ट्रपती डेल्सी रॉड्रिग्ज यांना व्हेनेझुएलाच्या हंगामी राष्ट्रपती म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं.