राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करू : ट्रम्प 

वृत्तसंस्था
रविवार, 6 जानेवारी 2019

मेक्‍सिको सीमेवरील भिंत बांधण्याच्या भूमिकेवर आपण ठाम असून, यासाठी अमेरिका सरकारचे "शटडाउन' एक वर्षभर चालले, तरी त्यासाठी मी तयार आहे, असे अमेरिकचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज सांगितले. या भींतीसाठी आवश्‍यक असलेल्या 5.6 अब्ज डॉलरचा संसदेत मंजुरी न मिळाल्यास राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करू, असा इशाराही ट्रम्प यांनी ट्‌वीटरद्वारे दिला आहे.

वॉशिंग्टन : मेक्‍सिको सीमेवरील भिंत बांधण्याच्या भूमिकेवर आपण ठाम असून, यासाठी अमेरिका सरकारचे "शटडाउन' एक वर्षभर चालले, तरी त्यासाठी मी तयार आहे, असे अमेरिकचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज सांगितले. या भींतीसाठी आवश्‍यक असलेल्या 5.6 अब्ज डॉलरचा संसदेत मंजुरी न मिळाल्यास राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करू, असा इशाराही ट्रम्प यांनी ट्‌वीटरद्वारे दिला आहे.

मेक्‍सिकोमधून येणारे निर्वासितांचे लोंढे रोखण्यासाठी या सीमेवर भिंत बांधण्याचा ट्रम्प यांचा इरादा आहे. या खर्चाला मंजुरी देण्यास विरोधी पक्ष तयार नसल्याने दैनंदिन खर्चाचे विधेयकही अडकून पडले आहे आणि त्यामुळे अनेक सरकारी संस्था, कार्यालये बंद आहेत. दोन आठवड्यांपासून सुरु असलेले "शटडाऊन' समाप्त करण्यासाठी विरोधकांबरोबर अनेकदा चर्चा होऊनही त्यातून मार्ग निघालेला नाही. सीमेवरील सुरक्षा अत्यंत महत्त्वाची असून, त्यासाठी हवे ते करण्यास मी तयार आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Trump threatens national emergency over wall