

Trump with pm Modi
Sakal
Trump with PM Modi: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत रशियाकडून तेल खरेदी करतो यावरून पुन्हा एक मोठा दावा केलाय. ट्रम्प यांनी म्हटलं की, भारत मला खूश करण्याचा प्रयत्न करत होता. नरेंद्र मोदी चांगले व्यक्ती आहेत. अमेरिकेनं भारतावर रशियन तेल खरेदी केल्याच्या कारणानं ५० टक्के टॅरिफ लागू केलाय. सुरवातीला २५ टक्के टॅरिफच्या घोषणेसह भारतावर दंडही लावला होता. यानंतर भारताने स्पष्ट केलं होतं की, आम्हाला रशियन तेलावरून अमेरिका आणि युरोपियन युनियनकडून टार्गेट केलं जात आहे.