Donald Trump : दहशतवाद्यांना मदत देणे थांबवा; ट्रम्प यांचा इराणला इशारा, अण्वस्त्र प्रकल्प बंद करण्यासाठीही दबाव
Trump warning to Iran over nuclear program : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला अण्वस्त्र प्रकल्प थांबवण्यास आणि दहशतवाद्यांना मदत बंद करण्याचा इशारा दिला आहे. आखाती देशांच्या नेत्यांपुढे त्यांनी हा मुद्दा स्पष्टपणे मांडला.
रियाध : ‘‘इराणने त्याचा अणुप्रकल्प थांबवावा यासाठी करार करण्यास मी उत्सुक आहे, मात्र त्यासाठी त्यांनी दहशतवाद्यांच्या छुप्या गटांना साहाय्य करणे थांबवावे,’’ असे आवाहन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आखाती देशांच्या नेत्यांना केले आहे.