नेमकं काय आहे त्या न फाटणाऱ्या फोटोमागचं 'रहस्य'

वृत्तसंस्था
रविवार, 23 डिसेंबर 2018

दोन दिवसापूर्वी क्वांटम सॅटेलाईटने 24.9 बिलियन पिक्सेल इतक्या प्रचंड ताकदीच्या कॅमेराने चीनमधील शांघाय शहराचा फोटो घेतल्याचा फोटो व्हायरल झाला. परंतु, आता त्या फोटोमागील रहस्य आणि सत्य समोर आले आहे. हा फोटो कुठल्या सॅटेलाईटमधून घेतला नसून जिंगकून टेक्नोलॉजी नावाच्या एका कंपनीने चिनमधील शांघाय शहराच्या ओरिएंटल पर्ल नावाच्या टॉवरवरून घेतला आहे.

शांघाय- दोन दिवसापूर्वी क्वांटम सॅटेलाईटने 24.9 बिलियन पिक्सेल इतक्या प्रचंड ताकदीच्या कॅमेराने चीनमधील शांघाय शहराचा फोटो घेतल्याचा फोटो व्हायरल झाला. परंतु, आता त्या फोटोमागील रहस्य आणि सत्य समोर आले आहे. हा फोटो कुठल्या सॅटेलाईटमधून घेतला नसून जिंगकून टेक्नोलॉजी नावाच्या एका कंपनीने चिनमधील शांघाय शहराच्या ओरिएंटल पर्ल नावाच्या टॉवरवरून घेतला आहे.

यावेळी बऱ्याच मराठी आणि इंग्रजी वृत्तसंस्थानी नवीन "क्वांटम टेक्नोलॉजी"च्या सहाय्याने ही प्रतिमा घेतली असल्याचे म्हटले होते. म्हणजेच ही प्रतिमा चिनी उपग्रहाच्या सहाय्याने घेतली असल्याचे सांगण्यात आले होते.

जिंगकून टेक्नोलॉजी या कंपनीच्या अधिकृत वेबसाइटनुसार, हे चित्र 195 बिलीयन मेगापिक्सेल एवढ्या ताकदीने काढले आले असल्याचे सांगण्यात आले आहे. शांघायची सुंदरता या फोटोमधून दिसत आहे. हा आशियातील सर्वात मोठा फोटो असल्याचेही सांगण्यात येत आहे. जिंगकून टेक्नोलॉजी एक जागतिक दर्जाची नाविन्यपूर्ण एंटरप्राइज आहे जे क्रिएटिव्ह फोटोग्राफी आणि क्लाउड डेटा प्रोसेसिंगवर काम करते. हा फोटो शांघाय शहराचा असून फोटो असून 360 डिग्री पॅनोरामिक रिझोल्यूशनला हा काढण्यात आला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Truth Behind Viral 24.9 Billion Pixel Image Taken By Chinese Quantum Satellite