हिंदू धर्मिय तुलसी गबार्ड उतरणार अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीत

वृत्तसंस्था
शनिवार, 12 जानेवारी 2019

वॉशिंग्टन : अमेरिकी अध्यक्षपदाची 2020 मध्ये होणारी  निवडणूक लढवण्यासाठी आपण तयार असून, याबाबत पुढच्या आठवड्यात अधिकृत घोषणा होणार असल्याचे हिंदूधर्मीय खासदार तुलसी गबार्ड यांनी 'सीएनएन'शी बोलताना सांगितले. 

जर त्या निवडून आल्या तर, 37 वर्षीय तुलसी गबार्ड या अमेरिकेच्या सर्वात तरुण राष्ट्राध्यक्ष ठरणार आहेत. तसेच त्या निवडणूक लढणाऱ्या पहिल्या हिंदू उमेदवार असतील. 

अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहात एखादे पद धारण करणाऱ्या पहिल्या हिंदू व्यक्ती आहेत. 2012 आणि 2016 असे सलग दोन वेळा गॅबार्ड हवाई प्रांतातून अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाच्या सदस्य म्हणून निवडून आलेल्या आहेत.

तुलसी गॅबार्ड यांनी अमेरिकन प्रतिनिधीगृहाच्या (काँग्रेसच्या) भगवद्‌गीतेवर हात ठेवून पदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली होती त्यामुळे त्या चर्चेत आल्या होत्या. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tulsi Gabbard Confirms 2020 US Presidential Run