Tunisia Boat : ट्युनिशियाच्या किनाऱ्यावर बोट उलटली; 28 प्रवाशांचा मृत्यू, 60 हून अधिक लोक बेपत्ता

ट्युनिशियाच्या किनारपट्टीवर (Tunisia Coast Boat Accident) एक मोठी दुर्घटना घडलीये.
Tunisia Coast Boat Accident
Tunisia Coast Boat AccidentSakal
Summary

इटालियन अधिकार्‍यांचा (Italian Officer) हवाला देत सीएनएननं वृत्त दिलंय की, हे स्थलांतरित भूमध्यसागर पार करून इटलीला जाण्याचा प्रयत्न करत होते.

ट्युनिस : ट्युनिशियाच्या किनारपट्टीवर (Tunisia Coast Boat Accident) एक मोठी दुर्घटना घडलीये. किनारपट्टीवर बोट उलटल्यामुळं किमान 28 प्रवासी मरण पावले, तर 60 हून अधिक बेपत्ता आहेत.

इटालियन अधिकार्‍यांचा (Italian Officer) हवाला देत सीएनएननं वृत्त दिलंय की, हे स्थलांतरित भूमध्यसागर पार करून इटलीला जाण्याचा प्रयत्न करत होते.

48 तासांत 58 बोटींना अपघात

अपघाताबाबत माहिती देताना इटालियन तटरक्षक दलानं (Italian Coast Guard) सांगितलं की, 'त्यांनी गेल्या 48 तासांत संकटात सापडलेल्या 58 बोटींमधून 3300 लोकांना वाचवलं. ट्युनिशियाहून आफ्रिकेतील सर्वात जवळचं इटालियन बेट असलेल्या लॅम्पेडुसा इथं जाणाऱ्या बोटींवर बहुतांश बचावकार्य करण्यात आलं.'

Tunisia Coast Boat Accident
Congress : आम्हाला 'परिवारवादी' म्हणता, मग प्रभू राम कोण होते? प्रियंका गांधींचा भाजपला थेट सवाल

शनिवारी 19 महिला आणि 9 अल्पवयीनांना ट्युनिशियाच्या बोटीतून लॅम्पेडुसा इथं आणण्यात आलं, असं सीएनएनचं वृत्त आहे. अवैध स्थलांतर रोखण्यासाठी ट्युनिशियाच्या मासेमारी नौकेची तपासणी केली जात आहे. आफ्रिका, मध्यपूर्वेतील गरिबी आणि संघर्षाचा सामना करणाऱ्या लोकांसाठी ट्युनिशिया हे मुख्य केंद्रबिंदू बनलंय. लिबियातून सर्वाधिक लोक ट्युनिशियामध्ये येत आहेत. या आठवड्यात लॅम्पेडुसातील बहुतेक लोक ट्युनिशियाहून बोटीतून आले होते.

Tunisia Coast Boat Accident
JDS च्या निवडणूक रॅलीनंतर फेकलेलं अन्न खाल्ल्यामुळं पोट फुगून 15 गायींचा मृत्यू; 20 वर उपचार सुरु

यूएनच्या आकडेवारीनुसार, 2022 मध्ये याच कालावधीत 1,300 च्या तुलनेत यावर्षी ट्युनिशियामधून 12,000 स्थलांतरित इटलीत आले. ट्युनिशियाच्या तटरक्षक दलानं या वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत 14,000 हून अधिक स्थलांतरितांना बोटीत रोखलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com