esakal | प्राध्यापिकेला केलं ट्युनिशियाची पहिली महिला पंतप्रधान; राष्ट्रपतींच्या निर्णयाने आश्चर्याचा धक्का
sakal

बोलून बातमी शोधा

najla-bouden-romdhane

ट्युनिशियात आधीचं सरकार बरखास्त केल्यानंतर हंगामी सरकारचे नेतृत्व करण्यासाठी राष्ट्रपतींनी नजला यांची नियुक्ती पंतप्रधान म्हणून केली.

प्राध्यापिकेला केलं ट्युनिशियाची पहिली महिला पंतप्रधान; राष्ट्रपतींचा निर्णय

sakal_logo
By
टीम ई सकाळ

ट्युनिशियाच्या राष्ट्रपती कैस सईद यांनी एका इंजिनिअरिंग स्कूलमधील प्राध्यपक महिलेला देशाची पंतप्रधान म्हणून घोषित केलं आहे. प्राध्यापक नजला बौदेंत रमजाने असं त्यांचं नाव असून ट्युनिशियाच्या त्या पहिल्या महिला पंतप्रधान ठरल्या आहेत. आधीच्या पंतप्रधानांना बडतर्फ केल्यानंतर हंगामी सरकारचे नेतृत्व करण्यासाठी राष्ट्रपतींनी नजला यांची नियुक्ती पंतप्रधान म्हणून केली.

राष्ट्रपती कार्यालयाने याबाबत दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले की, सईद यांनी नव्या पंतप्रधान नजला यांना लवकरात लवकर मंत्रिमंडळ स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. राष्ट्रपतींनी २५ जुलै रोजी संसद बरखास्त करण्याचे आदेश देत सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली होती. तेव्हापासून पंतप्रधान पद रिक्त होते. राष्ट्रपतींनी घेतलेल्या या निर्णयाने मुस्लिमवादी पक्षाला बाजूला सारले आहे. तर टीकाकारांनी यावर टीकाही केली आहे.

हेही वाचा: दहशतवाद विरोधी अभ्यासासाठी भारताचे पथक पाकिस्तानात जाणार

टीकाकारांचे म्हणणे आहे की, ट्युनिशियात यामुळे लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. राष्ट्रपतींनी सांगितलं की, 'देशाला आर्थिक आणि सामाजिक संकटातून वाचवण्यासाठी हे पाऊल उचलावं लागलं.' राष्ट्रपती कार्यालयाकडून एक व्हिडिओ प्रासारीत करण्यात आला आहे. त्यात ते नजला रमजाने यांची भेट घेताना दिसत आहेत. यावेळी त्यांनी पुन्हा पुन्हा एका महिलेचं नामांकन करताना हे ऐतिहासिक असल्याचा म्हटलं. तसंच सईद यांनी ही निवड ट्युनिशियासाठी आणि इथल्या महिलांचसाठी गौरवाची असल्याचंही म्हटलं आहे.

राष्ट्रपती सईद म्हणाले की, सरकारचा मुख्य उद्देश हा आहे की, अनेक सरकारी कंपन्यांमध्ये भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढले आहे ते रोखणे. नव्या सरकारला आरोग्य, वाहतूक आणि शिक्षणासह सर्व क्षेत्रात नागरिकांच्या मागण्या पूर्ण करण्याचं आणि त्यांच्या समस्या सोडवण्याचं आव्हान आहे. २०११ च्या बंडखोरीनंतर रमजाने या ट्युनिशियाच्या दहाव्या पंतप्रधान असणार आहेत. दहा वर्षांपूर्वी बराच काळ सत्ता हातात ठेवलेला हुकुमशहा जीन अल अबिदीन बेन अली यांचे सरकार उलथून लावण्यात आले होते.

loading image
go to top